Ad will apear here
Next
‘एलआयसी’चे प्रीमियम भरण्याची सुविधा आता ‘पेटीएम’वर
मुंबई : भारतातील सर्वात मोठी डिजिटल पेमेंट कंपनी असलेल्या ‘पेटीएम’च्या ‘वन९७ कम्युनिकेशन्स लिमिटेड’ने भारतीय जीवनविमा निगम (एलआयसी) या देशातील सर्वांत मोठ्या जीवनविमा कंपनीशी धोरणात्मक भागीदारी केली आहे. या मंचावरून ग्राहकांना आता काही सेकंदात ‘एलआयसी’चा हप्ता भरणे शक्य होणार आहे.

‘पेटीएम’वर ‘एलआयसी, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ, रिलायन्स लाइफ, मॅक्स लाइफ इन्शुरन्स, एचडीएफसी लाइफ, टाटा एआयए, एसबीआय लाइफ, आदित्य बिर्ला सन लाइफ, कॅनरा एचएसबीसी लाइफ इन्शुरन्स, श्री राम लाइफ आणि स्टार हेल्थ यांच्यासह ३० हून अधिक विमा कंपन्यांचे हप्त्ये सहजगत्या ऑनलाइन भरण्यासाठीची सुविधा उपलब्ध आहे. ‘पेटीएम’ हा ऑनलाइन विमा हप्त्ये भरण्यासाठी पसंतीचा मंच बनत आहे आणि या वर्षाच्या अखेरपर्यंत ३०-४० दशलक्ष पॉलिसींचा रनरेट गाठण्याचे या मंचाचे अनुमान आहे.

‘पेटीएम’चे सीओओ किरण वासिरेड्डी म्हणाले, ‘आपल्या देशात विम्याचे हप्त्ये सामान्यपणे ऑफलाइन पद्धतीने भरले जातात. आमच्या ग्राहकांना पेमेंटचा सुलभ अनुभव मिळावा अशी ‘पेटीएम’मध्ये आमची इच्छा आहे. ‘एलआयसी’ आणि इतर आघाडीच्या विमा कंपन्यांशी आम्ही केलेल्या भागीदारीमुळे आमच्या लाखो वापरकर्त्यांना पेटीएम अॅपवरून पसंतीची पेमेंट पद्धत वापरून आपली विमा पॉलिसीचे नूतनीकरण करण्याची सुलभ आणि वेगवान पद्धत उपलब्ध होईल.’
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZPBBU
Similar Posts
‘पेटीएम’ची ‘झोमॅटो’सह भागीदारी मुंबई : पेटीएम या डिजिटल पेमेंट कंपनीची मालकी असलेल्या ‘वन९७ कम्युनिकेशन्स लिमिटेड’ने ‘झोमॅटो’शी भागीदारी करत असल्याचे जाहीर केले असून, त्यांच्या मोबाइल अॅपच्या माध्यमातून फूड आणि डिलिव्हरी ऑर्डर करता येणार आहे. या मुळे यूझर्स आता आपल्या पेटीएम अॅपमधून आपले आवडते रेस्टोरंट शोधून तत्काळ खाद्यपदार्थ मागवू शकतील
‘पेटीएम’तर्फे ‘गेमपिंड फॅंटसी स्पोर्ट्स’चे सादरीकरण मुंबई : ‘पेटीएम’च्या ‘गेमपिंड’ या डिजिटल गेमिंग मंचातर्फे क्रिकेट प्रेमींसाठी आणि कार्ड गेमच्या चाहत्यांसाठी ‘गेमपिंड फॅंटसी स्पोर्ट्स’च्या सादरीकरणाची घोषणा केली आहे. ‘गेमपिंड’ने देश-विदेशांतील उच्च गुणवत्तेच्या स्टुडिओज आणि प्रकाशकांशी भागीदारी केली आहे.
‘यूपीआय’साठी पेटीएम सुरक्षित व्यासपीठ मुंबई : देय, बॅंकिंग, कर्ज आणि विमा भरण्याची सेवा देणारी भारताची सर्वात मोठी मोबाइल-फर्स्ट आर्थिक सेवा कंपनी पेटीएम यूपीआय व्यवहारांसाठी सर्वात सुरक्षित व्यासपीठ आहे.
‘पेटीएम’तर्फे व्यापाऱ्यांसाठी ‘इन्स्टंट बँक सेटलमेंट’ सेवा मुंबई : डिजिटल पेमेंट मंच असलेल्या ‘पेटीएम’ने आपल्या भागीदार व्यापाऱ्यांसाठी ‘इन्स्टंट बँक सेटलमेंट’ सेवा सुरू केली आहे. या सेवेद्वारे व्यापाऱ्यांना आपला दैनिक कॅश फ्लो सुधारून व्यापार वाढवण्यात सहकार्य मिळणार आहे. आपल्या ऑफलाइन दुकानांत ‘पेटीएम’द्वारे पेमेंट स्वीकारणाऱ्या ९.८ दशलक्षपेक्षा जास्त व्यापाऱ्यांना

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language